प्राचार्य घाळे दांम्पत्य "काॅंट्रीब्युशन टू एज्युकेशन कम्युनिटी" पुरस्काराने सन्मानीत
उदगीर : शहर आणि पंचक्रोशीत दर्जेदार शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे प्राचार्य विरभद्र घाळे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ.प्रेमा घाळे या दांपत्याने गेल्या पंचेवीस वर्षात उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना "काॅंट्रीब्युशन टू एज्युकेशन कम्युनिटी" पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
1997 मध्ये प्राचार्य विरभद्र घाळे व त्यांच्या पत्नी प्राचार्या सौ. प्रेमा घाळे यांनी विश्वशांती शिक्षण व समाजविकास संस्था स्थापण करून संस्थेमार्फत ब्राईट स्टार इंग्लीश स्कूलची सुरूवात केली. समाजातील सर्व घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचावे व ग्लोबलायजेशनच्या काळात समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शिक्षणासाठी पात्र ठरावा. या शिक्षणापासून कुणीही वंचीत राहू नये. हा त्यांचा हेतू होता. आजवर श्री व सौ घाळे दांपत्यांनी अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यास मदत केली आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणार्या कुटुंबातील मुलांना नाममात्र शुल्क व प्रसंगी मोफत शिक्षण त्यांनी ब्राईट स्टार या आपल्या शाळेद्वारे पुरवीले आहे. इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत नाहीत,स्पर्धा परीक्षांमध्येही मागे असतात हा लोकांचा गैरसमज त्यांनी आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्व परीक्षांमध्ये अव्वल स्थान प्राप्त करवून देऊन मोडीत काढला आहे. त्यांच्या या प्रेरणादायक आदर्श कार्याची दखल घेत एशीयन एज्यूकेशन अवॉर्ड्स व ग्लोबल टिचींग एक्सलेन्स अवॉर्ड्स यांच्या जुरी पॅनेलने कॉंट्रीब्यूशन टू एज्यूकेशन कम्युनिटी" हा पुरस्कार जाहीर केला आहे. यापूर्वी प्राचार्य घाळे यांना शिक्षणगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शिक्षणरत्न,प्राचार्या प्रेमा घाळे यांना होलीफेथ ग्रूपचा बेस्ट प्रिंसीपल अवॉर्ड व इतर अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
उदगीर शहरातील एक अग्रगण्य इंग्रजी माध्यमांची शाळा म्हणुन ब्राइट स्टार शाळेने नावलौकिक केले आहे ते श्री व सौ.घाळे यांच्या अविरत प्रयत्नामुळेच! असे म्हटले तर वावगे होणार नाही.
इंग्रजी माध्यमातील शिक्षण म्हटले की ,केवळ धनदांडगेआणि गर्भश्रीमंतासाठीच आहे,खुप खर्चिक असते.हा समज प्राचार्य विरभद्र घाळे आणि प्राचार्या प्रेमा घाळे यांनी आपल्या उदात्य ध्येयाने आणि गरीबांप्रती असलेल्या संवेदनांनी सफसेल खोटा ठरवत,सर्वच विद्यार्थी आपल्या श्रमावर मोठे होवू शकतात! जगात आपले नाव कमावू शकतात.हे प्रत्यक्ष कतीतून दाखवून दिले आहे.अशा सामाजिक जाणीवा जपणार्या व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणजे उदगीरच्या शैक्षणिक चळवळीचा गौरव आहे. अशा भावना उदगीरकरांच्या बनल्या आहेत.