विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
उदगीर : येथील विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल मध्ये चंद्रशेखर व्यंकट रमण यांचा जन्म दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकुण शंभर प्रयोग आपल्या कल्पनेतून साकारलेल्या प्रयोगाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव देण्यासाठी व त्यांच्यातील वैज्ञानिक शोध या बाल वर्गातून निर्माण व्हावा यासाठी शाळेमध्ये वैज्ञानिक व्यासपीठ तयार करून देण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष विजयकुमार पाटील शिरोळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे, मुख्याध्यापक एस.एन घोडके, ही.एम बांगे, पी.व्ही अजने, प्राचार्य व्ही.एस कणसे यांची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विषयाचे शिक्षक सुप्रिया जाधव, योगेश पाटील, वर्षा नेळगे, सविता बिरादार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर .डी पटवारी यांनी केले तर आभार सोनाली पाटील यांनी मानले.