सुवर्णामाताच्या राणी वाघमारेला शासनाचे पारितोषिक !

सुवर्णामाताच्या राणी वाघमारेला
शासनाचे पारितोषिक !


उदगीर : ग्रामीण भागातील युवाशक्तीला उद्योगनिर्मितीची माहिती व्हावी या उद्देशाने शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे इ.नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
या स्पर्धेत चित्रकला प्रकारात येथील सुवर्णामाता देशमुख कन्या विद्यालयातील नववीची विद्यार्थिनी  राणी सुधाकर वाघमारे हिने तृतीय क्रमांकाचे पाच हजार रूपयाचे पारितोषिक पटकवले. 
शासनाच्या वतीने तिच्या बॅक खात्यावर सदर रक्कम जमा करण्यात आली असून लवकरच प्रमाणपत्र वितरण होणार आहे. 
तिच्या या यशाबद्दल संस्था सचिव शिवराज पाटील पिंपरीकर, मुख्याध्यापक गोविंद बिराजदार, कलाशिक्षक दत्ता स्वामी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.



Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image