माझा गौरव नव्हे तर तो मराठी भाषेचा गौरव आहे - प्रा.रामदास केदार

 


माझा गौरव नव्हे तर तो मराठी भाषेचा गौरव आहे - प्रा.रामदास केदार

 


 

उदगीर : साहित्य लेखनासाठी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश झाल्याबद्दल केलेला गौरव हा माझा गौरव नव्हे तर तो मराठी भाषेचा गौरव आहे असे मत साहित्यिक प्रा. रामदास केदार यांनी व्यक्त केले.

   वाढवणा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मुंजेवार वाय.के .तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मुधाळे डी.जी. प्रा.पठाण आर. एस. प्रा.दहिफळे एस.पी.मनोज मुळे, हाळणे एस. एस.उपस्थित होते. या वेळी भाषादिनाचे औचित्य साधून प्रा. रामदास केदार यांनी विविध कविता सादर करुन कुसुमाग्रजांच्या साहित्य लेखनावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. अनिल मगर यांनी तर आभार प्रा इंद्राळेसर केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image