दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे

दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे



   देवणी : शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने ५ टक्के निधी राखून ठेवला आहे. तो निधी तात्काळ तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाच्यावतीने करण्यात आली असुन दिव्यांगाना न्याय न मिळाल्यास नगर पंचायत देवणी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष निळकंठ डोंगरे यांनी दिला आहे.


       देवणी शहरातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसुन कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी वणवण भटकावे लागत असुन देवणी शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या ५ टक्के निधी पासून वंचित आहे. त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. शासन व प्रशासनाने दिव्यांगकडे दुर्लक्ष आहे. केंद्र सरकार व राज्ये सरकारच्या विशेष निधीतून शहरी व ग्रामीण भागातल्या प्रत्येक दिव्यांगाच्या थेट खात्यामध्ये ५ टक्के निधी तात्काळ जमा करण्यात यावे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस मिळावा. यासाठी महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघ शाखा न्यायासाठी मैदानात उतरली असल्याचे स्पष्ट करीत संघटनेचे तालुकाध्यक्ष निळकंठ डोंगरे यापुढील काळात विविध आंदोलन करुन दिव्यांगाच्या समस्या सोडविण्याचे काम संघटना करणार असल्याचे जाहिर केले.


       देवणी शहरातील दिव्यांग व्यक्तींना न्याय देण्यासाठी व त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी त्यांना मिळावा यासाठी आवाज उठवत असुन नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र अपंग कामगार संघटनेचे निवेदन देवून दिव्यांग व्यक्तींचा राखीव निधी तात्काळ जमा न झाल्यास नगर पंचायत कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर निळकंठ डोंगरे, शेख साजिद, प्रशांत शिंदे, प्रकाश कांबळे, वत्सलाबाई सुर्येवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
उदगीर येथे आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह....  एकुण रुग्णांची संख्या २२
Image
शहरात काॅरनटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत - राज्यमंत्री संजय बनसोडे
Image
उदगीरच्या आणखी एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह...एकुण रुग्णांची संख्या १४ वर
Image
शिवाजी महाविद्यालयात दोन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन