शिवाजी महाविद्यालयात दोन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
उदगीर : येथील शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने 10 व 11 जून 2020 ला दोन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे. covid-19 मुळे सध्या लाँकडाऊन असल्यामुळे सर्वजण आपापल्या घरी आहेत .म्हणून इंग्रजी विभागाने ही परिषद ऑनलाईन पद्धतीने ठेवलेली आहे .या परिषदेचा विषय 'द रोल ऑफ लिटरेचर इन द टाइमऑफ क्रीसिस लाईक कोरोनाव्हायरस पंँडेमिक' हा आहे. या परिषदेसाठी साधन व्यक्ती म्हणून बि.के. एन. एम.यू.जुनागड गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. चेतन त्रिवेदी, अहमदाबाद विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अमी उपाध्याय, सुप्रसिद्ध साहित्यिक गोपाल बघेल, बस्तार विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एन. डी.आर.चंद्रा, हिमाचल प्रदेशातील कुलगुरु डॉ. सुब्रमण्यम रमण अय्यर, ढाका विद्यापीठातील प्रो.एम.मनीरुझामन, डॉ.सचिन काटकर, डॉ.अमर सिंग, डॉ.अंपट कोशी, डॉ. डी.टी.मारक्स, डॉ.युनुस फानुसी, डॉ.दुष्यंत निमावत , डॉ.अमिताभ द्विवेदी, डॉ.स्मिता राय, डॉ.प्रभाकर एस., डॉ.इतिश्री सारंगी, डॉ.गांधी सुब्रमण्यम, डॉ.कानवार सिंग, डॉ.दिलीप चव्हाण, डॉ.अशोक सरवदे, डॉ.शिवाजी सरगर, डॉ. कोलेकर टी., कॅप्टन बसुदेव पोळ, गोरखनाथ गंगणे, डॉ.अंकिता खन्ना, डॉ.एस.तिरुनवीकरुशीव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिषदेमध्ये पेपर, नावनोंदणी व फीस पाठविण्यासाठी https://forms.gle/2dEemsAqB9tvtcjx8 ही गुगल फॉर्म लींक आहे. तरी प्राध्यापकांनी व इतर सहभागी होऊ इच्छणार्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन परिषदेचे संयोजक तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ .अरविंद नवले , प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव यांनी केले आहे.