सैनिकी विद्यालयाचा किशोर शेंटेवाड याची भारतीय थलसेनेत निवड
उदगीर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान वर्गात शिकणारा किशोर शेंटेवाड या विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यातील थलसेनेतील (परमवीर चक्र विजेते) महार रेजिमेंट या युनिटमध्ये निवड झाली आहे.
शैक्षणिक वर्ष 2019- 20 मध्ये तो सैनिकी विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत होता.
या यशाबद्दल किशोर शेंटेवाड याचे व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षण निदेशक उमाकांत देवणे, बी.टी.पाटील, सुधीर गायकवाड, मुजीब मोमिन, शिवकुमार कोळ्ळे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म.पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, चंदन पाटील नागराळकर, कमांडंट कमांडर बी. के. सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी, प्रा. प्रदीप कोठारे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.