ग्रामीण पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली केली कार्यवाही

ग्रामीण पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली केली कार्यवाही



   उदगीर : तालुक्यातील मौजे देवर्जन येथे एका शासनाची बंदी असूनही अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक नामदेव सारोळे यांनी त्यांच्या सहकार्यासोबत सापळा रचून अवैध गुटखा विक्री करणाऱ्या एका दुकानदारास मुद्देमालासह पकडून गुन्हा दाखल केला आहे.


   याबाबत अधिक माहिती अशी की देवर्जन येथील शनिदेव किराणा दुकानाचे मालक संजय धोंडीबा उदबाळे वय ४० वर्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून संचार बंदी असतानाही अवैध गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगुन त्यामध्ये गुटका व सुगंधी तंबाखू असा एकूण २०७४५०/- रुपयाचा माल ग्रामीण पोलिसांनी पकडुन पो.ना. सारोळे यांच्या फिर्यादीवरुन संबंधित दुकानदारावर गुरनं २७६/२० कलम १८८, २६९, २७२, २७३ भादवी ५९ अन्नसुरक्षा आणि मा.न.के अधिनियम २००६ सह कलम ११ महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० व कलम २, ३, ४, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.नि. पल्लेवाड हे करीत आहेत. याकामी पोलीस नाईक चंद्रकांत कलमे, पो.काॅ. राहुल गायकवाड, पो.काॅ. तुळशीराम बरुरे, चालक दयाराम सुर्यवंशी आदींनी सहकार्य केले.


 


उदगीरकर अनुभवताहेत नविन अधिका-यांचा बदलीचा परिणाम गेल्या अनेक दिवसापासून उदगीर शहर व तालुका हे जणु अवैध धंद्याचे केंद्र बनले होते. या अवैध धंदेवाल्याना कायदाचा धाक राहिला नव्हता मात्र प्रशासकीय कारणे दाखवून उदगीर शहर व ग्रामीण पोलिसांच्या बदल्या झाल्या व गेल्या महिनाभरात अवैध धंदे व गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या कामाची जणु मोहीमच ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी घेतल्याने उदगीर तालुकावासिय अनुभवताहेत नविन अधिका-यांचा बदलीचा परिणाम आणि त्यांच्या या कार्याबद्दल ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे.


 


 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image