कोरोना योद्धे डॉ. शरदकुमार तेलगाने यांचा सत्कार 

कोरोना योद्धे डॉ. शरदकुमार तेलगाने यांचा सत्कार 



   उदगीर  :  येथील एक सामाजिक कार्यकर्ते तथा समाज प्रबोधनपर कीर्तनकार, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, म्हणून उत्कृष्ट कार्य केले. त्याबद्दल लायनेस क्लब उदगीर च्या वतीने डॉ. शरदकुमार तेलगाने व डॉक्टर सीमा तेलगाणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुकही करण्यात आले. या सत्कार समारंभाच्या वेळी लॉयन्स समन्वयक अभिजीत औटे, लायन्स क्लब उदगीर अध्यक्षा चंद्रकला बिरादार, सचिव सुनिता पंडित, कोषाध्यक्षा प्रेमलता नळगिरे, सहसचिव मीनाक्षी स्वामी, सहकोषाध्यक्ष चंचला हुगे, सदस्य अनिता नेमताबादे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी परिस्थिती कोणतीही असो डॉक्टरांनी सामाजिक जाणिवा जपून रुग्णसेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. भविष्यातही आम्ही सामाजिक जाणीवा जपण्याचा सतत प्रयत्न करू. आमच्या  कार्याची दखल घेऊन आमचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल ऋण व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अभिजीत औटे यांनी केले तर आभार प्रदर्शन लायन्स क्लब उदगीरच्या अध्यक्षा चंद्रकला बिरादार यांनी मानले.


 


 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image