तळवेस येथील समाज मंदिराचे नूतनीकरण करण्याची मागणी

तळवेस येथील समाज मंदिराचे नूतनीकरण करण्याची मागणी



   उदगीर : येथील तळवेस गल्ली मधील समाज मंदिराची अत्यंत दुरावस्था झाली असून त्याचे तात्काळ नूतनीकरण करावे अशी मागणी रि.पा.इं (आ) युवक आघाडीचे सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.


    उदगीर शहरातील पहिले समाज मंदिर हे तळवेस गल्ली येथील समाज मंदिर असून हे समाज मंदिर 50 ते 60 वर्षापूर्वीचे अत्यंत जुने आहे. या समाज मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम व महिला बचत गटाच्या मिटिंग होतात. या समाज मंदिराची दुरवस्था झाली असून या समाज मंदिराच्या खिडक्या, दरवाजे, तर छतामधून पाणी गळत आहे व आतील भागात पाणी साचत आहे तसेच छत व भिंतीची तर खूपच वाईट अवस्था झाली असून ते कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी याकडे ना. संजय बनसोडे व उदगीर नगर पालीका प्रशासनाने लक्ष घालून तळवेस येथील समाज मंदिराचे तात्काळ नूतनीकरण करावे अशी मागणी रि.पा.इं.(आ) युवक आघाडीचे सुशीलकुमार शिंदे, राहूल कांबळे, नितीन गायकवाड, कपिल शिंदे, अतुल कांबळे, नरेश चांदे राजकुमार माणसे,आकाश गायकवाड आदींनी केली आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image