विनापरवाना १० ते १२ मजूर घेवुन बांधकाम केल्याने एकावर गुन्हा दाखल
ग्रामीण पोलीसांच्या कार्यवाहीचा धडाका सुरूच तीन दिवसात ४ जणावर कार्यवाही
उदगीर : कोरोना या रोगाचा संसर्ग वाढत चालल्याने संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. ही बाब काही नागरीक गांभीर्याने घेत नसल्याने ग्रामीण पोलिसांनी गेल्या ३ दिवसात ४ जणांवर गुन्हे दाखल करुन ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी कार्यवाहीचा धडाका सुरु केला असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
हैबतपुर ता. उदगीर येथील शिवारात तानाजी माधव फुले वय २५ यांनी त्यांच्या शेतात १० ते १२ मजुर घेवुन हैबतपुर पाटी येथे विनापरवाना बांधकाम करत असल्याचे निर्दशनास आले. कोरोनाचा संसर्ग पसरविण्याचा संभव आहे असे कृत्य करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे व संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पो.हे.काँ. शिवाजी केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन यांच्यावर. गुरनं २७५/२० क १८८, २६९ भादवीसह नियम क्र. ११ महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० व कलम २, ३, ४, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काॅ. शेळके करीत आहेत.