शिवाजी महाविद्यालयाच्या निकालाची यशाची परंपरा कायम
उदगीर - शिवाजी महाविद्यालयाच्या कला,वाणिज्य, विज्ञान,व एमसीव्हीसी या चारही शाखेचा निकालाने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी निकालाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल 94.74 टक्के लागलेला आहे. यामध्ये कला शाखेचा निकाल 84.68 टक्के लागलेला आहे, विज्ञान शाखेचा निकाल 96.42 टक्के लागलेला आहे,वाणिज्य शाखेचा निकाल 97.24 टक्के लागलेला आहे तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. विज्ञान शाखेतील एकूण 448 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील 21 विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये,148 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 261 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत आले,वाणिज्य शाखेत एकूण 145 विद्यार्थी बसले होते त्यातील 30 विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये ,64 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 46 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत आले तर कला शाखेतील एकूण विद्यार्थी 111 परीक्षेत बसले होते, त्यातील 06 विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये 24 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 57 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत आले. महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थाकडून कठीण मेहनत करून घेतात. त्यामुळेच महाविद्यालयाने ही निकालाची यशाची परंपरा कायम राखली .यामध्ये प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. जी. जाधव ,पर्यवेक्षक प्रा .एस.एस. धनगे व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गांनी अतिशय मेहनत घेऊन ही निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशामध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही योगदान आहे.या निकालाच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजयकुमार पाटील शिरोळकर, सचिव मा.ज्ञानदेव झोडगे व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.