सैनिकी विद्यालयाचा एच.एस.सी (विज्ञान) चा 100 टक्के निकाल

सैनिकी विद्यालयाचा एच. एस.सी (विज्ञान) चा न 100 टक्के निकाल


उदगीर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्य.व उच्च माध्य. विद्यालयाचा एच. एस. सी ( विज्ञान) चा निकाल 100 टक्के लागला आहे.


फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला .या परीक्षेत सैनिकी विद्यालयाच्या एकूण 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी 42 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत,15 विद्याथी प्रथम श्रेणीत तर 01 विद्याथी डिस्टींगशन मध्ये उत्तीर्ण झाला आहे.


विद्यालयातून शुभम शांतीप्रकाश खड्डे याने 80.31 टक्के घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. श्रेयस अनिल सायरे 68.31 टक्के घेऊन द्वितीय,तर प्रसाद किशन लष्करे 67.69 टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.


सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उदगीरच्या निकालाची शैक्षणिक परंपरा कायम ठेवत उत्तुंग यश संपादन केले आहे .या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणारे प्रा.प्रदीप कोठारे ,प्रा.शिवाण्णा गंदगे,प्रा.नितीन पाटील,प्रा.युवराज दहिफळे,प्रा.सौ.सीमा मेहत्रे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म.पाटील नागराळकर , संस्थेचे उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, चेतन पाटील नागराळकर, कमांडंट कमांडर बी. के .सिंह ,प्राचार्य वसंत कुलकर्णी ,पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के ,सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image