उदगीर : काल दि. 5 जून रोजी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निडेबन येथे भगवान श्रीराम मंदिर परिसर, शेल्हाळ रोड, उदगीर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप कोयले आणि सुमंगल हॉस्पिटल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या वृक्षारोपणाच्या उपक्रमासाठी लागणारी पूर्ण तयारी अर्थात वृक्षलागवडीसाठी लागणारे खड्डे खोदून घेणे, झाडांची निवड, संख्या, प्रकार इत्यादी गोष्टी, झाडांना पाणी देण्यासाठी टँकर, झाडाभोवती कुंपण म्हणून वापरायची जाळी आदी सर्व तयारी सामाजिक कार्यकर्ते संदीप कोयले यांनी स्वखर्चाने केली असल्याने नागरीकांतुन त्यांचे कौतुक होत आहे.
येथील काल पर्यंत साधारण दिसणाऱ्या श्री राममंदिर परिसराला आता बागेचे रूप आले आहे. नुसती वृक्षलागवड करून फायदा नाही, ती सर्व झाडे वाढली पाहिजेत, फुलली पाहिजेत, जगली पाहिजेत असा संदीप कोयले यांचा मानस आहे. यासाठी लागणारे सर्व प्रयत्न आणि तयारी करण्याची त्यांनी इच्छा जनस्तंभ न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केली आहे.
संदीप कोयले यांच्या रूपाने भेटलेल्या सच्या निसर्गप्रेमीचे परिसरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याची सर्वाना प्रेरणा मिळावी. त्यांचा मदतीचा हात तर नेहमीच तयार आहे.
या छोट्याश्या उपक्रमातून भेटलेली ऊर्जा घेऊन संदीप कोयले यांनी पूर्ण शेल्हाळ रोड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे.