उदगीर : येथील नगर परिषदेला बौद्ध विहारासाठी २ कोटी रुपयाचा निधी नुकताच मंजूर झाला असुन सदर बौद्ध विहार बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी उदगीर येथील नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नगरपालिकेने शासनाकडे बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी ज्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या भागातील शॉपिंग दुकाने व रयतू बाजार तसाच अविकसीत पडला आहे त्याचे काय झाले याचे नियोजन आगोदर शासनाने करावे. त्या ठिकाणी समाजाची लोकवस्ती असल्याने तेथेच विहार करावे या गोंधळात न राहता भविष्याचा विचार करून चांगल्या ठिकाणी बौद्ध विहाराची निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
उदगीर शहरातील बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी जी जागा लागणार आहे त्या खालील ठिकाणी म्हणजे श्यामलाल इंजिनीरिंग कॉलेज, रेल्वे स्टेशन जवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपे)मोकळी जागा, दूध डेअरी च्या बाजूची मोकळी जागा, रजिस्टर ऑफिस च्या बाजूची न. प. ची मोकळी जागा व आज जे कला मंदिर आहे त्या मोकळ्या जागी या पाच ठिकाणापैकी एका जागेत बौद्ध विहार व्हावे व ते भविष्यात एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास यावे यासाठी शासनाने नगर परिषदेस ठराव घेण्याच्या सुचना कराव्यात व जागा उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक गजानन सताळकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे . सदर निवेदनाच्या प्रती माहितीस्तव म्हणुन समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख, पर्यावरण व बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी कामगार मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, उपजिल्हाधिकारी, उदगीर, मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर यांच्याकडे पाठवले आहे.