उदगीर शहरातील कोरोना बाधीत क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी

उदगीर शहरातील कोरोना बाधीत क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी


लातूर : उदगीर उपविभागात कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये, कोरोना विषाणुचा संसर्ग इतर नागरीकांना होवू नये म्हणून नागरीकांची हालचाल/ फिरणे हयावर निर्बंध लावणे आवश्यक असल्याने उपविभागीय अधिकारी उदगीर यांनी पुढील भागात कोरोना रुग्ण्‍ आढळून आल्याने प्रस्तावीत केल्यानुसार पुढील प्रमाणे Action Plan for Cluster Containment निर्धारीत करण्यात आलेले आहे. Cluster Containment Plan चा तपशील पुढील प्रमाणे आहे.


Cluster Containment Zone-18 – समाविष्ट असलेल्या संबंधीत गल्ली/ परिसराचे नाव- चिल्लरगे गल्ली उदगीर, कालावधी दिनांक 10 जून 2020 ते 23 जून 2020 , Cluster Containment Zone-19 – समाविष्ट असलेल्या संबंधीत गल्ली/ परिसराचे नाव- अंबेसंगे गल्ली, चौबारा रोड उदगीर दि. 11 जून 2020 ते 24 जून 2020.


जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्राप्त अधिकारानुसार उपरोक्त Containment plan मधील क्षेत्राचा भौगोलिक सिमा बंद करण्यात येऊन Cluster Containment plan नुसार याबाबतीत शासनाकडून निर्गमीत सुचनेनुसार कार्यवाही करणे बाबत आदेश जारी केले आहे.


तसेच सदर Cluster Containment क्षेत्रामध्ये आदेश निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून दिनांकापासून 14 दिवसांपर्यंत इसमांना फिरण्यास मज्जाव करण्यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कमल 144 नुसार मनाई हुकूम आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच सदर क्षेत्रामध्ये येण्यास व जाण्यास फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे तरतुदीनुसार निर्बंध/ मज्जाव घालण्यात येवून मनाई हूकूम आदेश लागू करण्यात येत आहे.


उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर यांनी शासनाने Containment plan च्या कार्यवाहीच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनेनूसार आवश्यक तो पोलीस बंदोबस्त Check Post इत्यादी बाबत व मुख्याधिकारी नगर परिषद/ गटविकास अधिकारी उदगीर यांनीही Containment plan च्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत निर्देशीत करण्यात येत आहे.


सदर भागात अत्यावश्यक सेवा पुरवठयाबाबत आवश्यक ती व्यवस्था व कार्यवाही Containment Zone 18 आणि 19 बाबत मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर/ गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर यांना निर्देशीत करण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना Physical Distancing चे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्यात यावे. सदर मनाई हुकूम आदेशाच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी/ त्यांचे वाहने/ सर्व शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपात्काल सेवा, यांना मुभा राहील.


यासोबत Points of Action & Checklist for Contaiment Zone as per Containment plan Novel Coronavirus Disease 2019 (COVID-19) Version 2 (updated 16.5.2020) सहपत्रीत करण्यात येत असून त्यानुसार संबंधितांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image