प्रा.प्रदिप वीरकपाळे यांच्या वाढदिवसा निमित्य अन्नधान्याच्या 251किटचे वाटप
उदगीर : येथे अविरत समाजसेवेच्या उद्दिष्ठाने श्रीकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक, 11पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक प्रा.प्रदिप वीरकपाळे यांचा वाढदिवस साजरा करून, या वाढदिवसाच्या निमिताने 251 गरजू लोकांना घरपोच अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ.उषाताई कांबळे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूराव राठोड, पी.टी.ए चे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड,पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, न.प.चे माजी उपाध्यक्ष शिवराज पाटील, श्री.सुभाष ख्याडे, मासिक अनुभव मंटपाचे अध्यक्ष श्री.राजकुमार बिरादार बामणीकर, प्रा.डॉ.धनंजय पाटील, प्रा.पांडुरंग फड, श्री.राजकुमार कपाळे, बालाजी जलमपुरे, सौ.बालिका मुळे, सौ. पुष्पाताई गायकवाड, सौ.प्रेमला हेरकर, सौ.मजगे, सौ.कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाढदिवसाच्या निमित्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा. प्रदिप वीरकपाळे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचीत सत्कार करण्यात आला त्यानंतर पी.टी.ए चे तालुकाध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून या प्रतिष्ठानचा उद्देश उपस्थितांना सांगितला त्यानंतर अन्नधान्याच्या 251किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन प्रा. सिध्देश्वर पटणे यांनी केले तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.