शिवाजी महाविद्यालयातील प्रा.डॉ.विजय जाधव यांचे आंतरराष्ट्रीय प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित
उदगीर - शिवाजी महाविद्यालयातील प्रा.डॉ. विजय जाधव यांचे Bismuth Ferrite Based Electrochemical Super capacitor या पुस्तकाचे प्रकाशन स्वित्झर्लंड येथील Springer Nature Publisher या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाकडून झाले .डॉ.जाधव यांचे संशोधन कार्य खूप भरीव स्वरूपाचे आहे.मागील दोन वर्षापासून ते संशोधन कार्यासाठी आयर्लंड येथे गेलेले होते. त्यांच्या संशोधन कार्याची दखल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे. विद्यापीठांतर्गत अशा संशोधनासाठी बाहेरच्या देशात गेल्यामुळे विद्यापीठाच्या संशोधनात्मक कार्यात जाधव यांनी मानाचा तुरा रोवला आहे. एवढेच नव्हे तर त्यांची नुकतीच Bentham Science Publisher या पब्लिशरने Bentham Ambassador पदी निवड केली आहे.शिवाजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासामध्ये डॉ. जाधव हे भरीव योगदान देत आहेत.त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजयकुमार पाटील शिरोळकर ,सचिव मा.ज्ञानदेव झोडगे, प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव ,प्राध्यापक व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.