अवैध दारु प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
उदगीर : तालुक्यातील मल्लापुर परिसरात अवैध दारु विक्री होत असल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांना मिळाल्याने सदर ठिकाणी धाड बिअर व मोटारसायकल असा एकूण ५१,९८० रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील मल्लापुर शिवारातील आरव बारच्या मालकाच्या शेतात आरोपी योगीराज लांडगे, मारूती पलमटे हे विनापरवाना बेकायदेशीर रित्या एका खताच्या पोत्यामध्ये बोअरच्या १२ बाटल्याचा बाॅक्स दुचाकीवरुन घेवुन जात असताना ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर आरोपी मलासह पकडून ग्रामीण पोलीस ठाण्याचे चंद्रकांत कलमे यांच्या फिर्यादीवरुन या दोन आरोपीवर गुरनं १३७/२०२० क ६५ (अ) (ई) ८१,८३, मप्रोका नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.