राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली कंटेनमेंट झोनची पाहणी

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली कंटेनमेंट झोनची पाहणी



  लातूर : उदगीर शहरातील हनुमाननगर, नुर पटेल कॉलनी, विकासनगर कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कंटेनमेंट क्षेत्राची पाहणी केली तसेच आरोग्य, महसुल, नगरपालिका विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती यावेळी घेतली.


यावेळी कंटेनमेंट झोन मधील नागरीकांना लागणारे जिवन आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या. तसेच आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रुग्णाकरींता अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच नगरपालिका, महसुल, आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती ही यावेळी घेतली. तसेच उदगीर तहसील कार्यालयात, महसुल, पोलीस, आरोग्य, नगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेऊन यापुढे प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाय योजना राबविण्याचे निर्देश दिले.


यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, रामराव बिरादार, शिवाजीराव मुळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, न. प. मुख्याधिकारी भरत राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवार, डॉ. देशपांडे, शहर पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, शहर अध्यक्ष समीर शेख, शहर अध्यक्ष मंजुरखाॅं पठाण, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image