राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण व रक्तदान शिबीर
उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्य उदगीर येथील ना.संजय बनसोडे यांच्या कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे यांच्या हस्ते धवजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबीर नागप्पा अंबरखाने ब्लड बँक येथे घेण्यात आले. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले व कोरोनाच्या पाशर्वभुमीवर शहर व तालुक्यात कोरोना वाॅरिअर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, शहराध्यक्ष समिर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, नवनाथ गायकवाड, मोईन शेख, समद शेख, धनाजी बनसोडे, मुकेश भालेराव, शाम डावळे, संघशक्ती बलांडे, शफी हाशमी, राजीव वाघे, असलम शेख, बस्वराज म्हादा, अजय शेटकार, कैलास पाटील, अबरार शेख, अरुण नळगीरकर, युवराज कंडगीरे, आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.