भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी संदीप मद्दे रेड्डी यांची निवड

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी संदीप मद्दे रेड्डी यांची निवड



   उदगीर :  तालुक्याचे भुमीपुत्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे निकटवर्तीय असलेले संदीप माधवराव मद्दे रेड्डी यांची लातूर भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.


युवा कार्यकत्यामध्ये व समाजातील गोरगरीबांची कामे करुन सतत अग्रेसर राहून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम आज पर्यंत संदीप मद्दे रेड्डी यांनी केले आहे. त्यासोबत होतकरू, अपंग व गोरगरीबांना व शालेय विद्यार्थ्यांनाही त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे.  त्यांचा तरुणामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. याच कामाची दखल घेवुन भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


यावेळी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रुंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेशआप्पा कराड, जि.प. अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे, जि.प.सदस्य रामभाऊ तिरुके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, नगरसेवक गणेश गायकवाड, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकुर यांची उपस्थिती होती. सदर निवडीबद्दल संदीप मद्दे रेड्डी यांचे मित्र परिवारातुन अभिनंदन होत आहे.