विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या दोन भावंडाच्या कुटुंबियांना राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते आठ लाखाच्या धनादेशाचे वितरण

विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या दोन भावंडाच्या कुटुंबियांना राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते आठ लाखाच्या धनादेशाचे वितरण



   लातूर :  जळकोट तालुक्यातील हळद वाढवणा या गावातील एका शेतकरी कुटुंबातील दोन भावंडांचा शेतात काम करत असताना विजेच्या चालू तारांचा धक्का लागून मृत्यू झाला. त्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये याप्रमाणे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्फत संसदीय कार्य, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते 8 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण हळद वाढवणा येथे जाऊन आज करण्यात आले.


उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, विद्युत वितरण कंपनी लातुर मुख्य अभियंता आर. आर. कांबळे, विद्युत वितरण कंपनी लातुर अधिक्षक अभियंता रवींद्र नरगलीकर, कृ.उ.बा समिती जळकोट सभापती मन्मथ किडे, अर्जुन आगलावे, जि. प. सदस्य बाबुराव जाधव, जि. प. गटनेते संतोष तिडके , मोमीन, काळे सरपंच संतोष पाटील, अरविंद पाटील, विठ्ठलराव चव्हाण, बाबुराव सुर्यवंशी,  संभाजी पाटील, चंद्रशेखर पाटील,  गोविंदराव ब्रहमन्ना, किरण पवार,  गजानन दळवे, सत्यवान पाटील, संग्राम पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image