माजी उपसभापती रामदास बेंबडे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


   उदगीर :  तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आश्वासक युवा चेहरा म्हणून परिचित असलेले उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास बेंबडे यांची लातूर भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


रामदास बेंबडे यांच्या निवडीने तालूक्यातील युवा वर्गात उत्साह संचारला असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. उदगीर तालूक्यातील युवा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी बेंबडे यांना नियूक्ती देण्यात आली असून भविष्यात युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. यावेळी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रुंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेशआप्पा कराड, जि.प. अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे, जि.प.सदस्य रामभाऊ तिरुके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांच्या उपस्थिती होती. उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास बेंबडे यांची युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 


 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image