तालुक्याचे भुमीपुत्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे खंदे समर्थक सागर बिरादार यांची लातूर भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
युवा कार्यकत्यामध्ये व समाजातील गोरगरीबांची कामे करुन सतत अग्रेसर राहून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम सागर बिरादार यांनी केले आहे. त्यासोबत गावातील स्वस्त धान्य दुकानाचा घोटाळा असो की अवैध दारू विक्री याबाबत शासन दरबारी त्यांनी आवाज उठवला होता. याच कामाची दखल घेवुन भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रुंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेशआप्पा कराड, जि.प. अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे, जि.प.सदस्य रामभाऊ तिरुके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, नगरसेवक गणेश गायकवाड, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकुर यांची उपस्थिती होती. सदर निवडीबद्दल सागर बिरादार यांचे मित्र परिवारातुन अभिनंदन होत आहे.