वीरशैव लिंगायत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साडेतीन लाख रुपयांचे वाटप

वीरशैव लिंगायत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साडेतीन लाख रुपयांचे वाटप



    उदगीर :    सामाजिक बांधिलकी व समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करीत आहेत, परंतू उदगीर येथील वीरशैव लिंगायत चॅरीटेबल ट्रस्ट गरजवंताना बिनव्याजी मदत करणारी राज्यातील एकमेव चॅरिटेबल ट्रस्ट आहे. अनेकांच्या संसाराला उभे करण्यासाठी वीरशैव लिंगायत चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत 105 गरजू व होतकरू महिला व सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची बिनव्याजी आर्थिक मदत केली आहे.


आर्थिक मदतीच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे करण्याचे खुप मोठे सामाजिक काम संस्थेचे अध्यक्षचंद्रकांत वैजापुरे यांनी केल्याचे गौरवउद्गार कृषी बाजार समितीचे सभापती सिध्देश्‍वर उर्फ मुन्ना पाटील यांनी व्यक्त केले.


दि.३ जुन रोजी वीरशैव लिंगायत चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने कर्जाची परतफेड करणार्‍या लाभार्थ्यांचा सत्कार व नवीन कर्ज वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभाष धनुरे, बाबुुराव समगे, बाबुराव पाढंरे, पप्पू डांगे, श्रीकांत पाटील, प्रा.प्रदीप वीरकपाळे, प्रा.सिध्देश्वर पटणे, साईनाथ चिमेगावे, रमाकांत चटनाळे, अ‍ॅड.सुनील रासुरे, राम मोतीपवळे, शुभम चणगे, रवि हसरगुंडे, माधव घोणे, शिवराज पाटील, श्रीमती विमलताई गर्जे,रमेश खंडोमलके, हरिशचंद्र वट्टमवार, उमाकांत सुदांळे, बालाजी जलमपुरे, माधव बिरादार चिघळीकर, वसंत शिरसे, कल्याण बिरादार, विठ्ठलराव मुंडे, ज्ञानोबा मुंडे, सुयोग निडेबने, कपील शेटकर, धोंडीबा सुगावकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैजापुरे यांनी सामाजिक बांधिलकी व समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. लाभधारकांनी या पैशाचा चांगला वापर करावा आणि वेळेवर परतफेड करावी, याचा फायदा इतर समाजबांधवांना होणार असल्याचे मत मांडून लाभार्थ्यांचा व उपस्थितांचा गौरव केला.


या कार्यक्रमात कर्जाची परफेड करणारे शिवलिंग स्वामी, राजकुमार बिरादार, मारोती बिरादार, श्रीमती शरयु बिरादार सर्व रा.बामणी यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात शिवराज गंगापुरे, विरभद्र बिराजदार, संदीप बिरादार, माधव बिराजदार, प्रेमला हेरकर, राम बिरादार, मनोज निजवंते यांना प्रत्येकी ५० हजार रुपयाचे बिनव्याजी कर्जवाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सिध्देश्‍वर पटणे यांनी तर आभार संयोजक श्री क्षेत्र महादेव मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मानले.