भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या उदगीर
चिटणीस पदी संदीप कोयले
कोरोनाच्या काळात जपली सामाजिक बांधिलकी
उदगीर : देशभरात कोरोनाच्या महामारीने धुमाकुळ घातला असल्याने अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे मात्र निडेबन येथील युवा कार्यकर्ते संदीप कोयले यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या निस्वार्थ भावनेतुन
केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. म्हणून त्यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या उदगीर चिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
उदगीर येथे कोरोना संकटात जनतेच्या रक्षणासाठी दिवस रात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना व सफाई कामगारांनट सॅनिटायझर, मास्क देवून यासोबतच त्यांच्या रोजच्या नाष्ट्याची सोय करुन त्यांची आरोग्य तपासणी करणारे हे संदीप कोयले हे तालुक्यात एकमेवच असतील.
माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने 1111 वृक्षारोपण केले व त्यांच्या संवर्धन करीता ते जातीने लक्ष घालुन स्वतः त्या झाडांना पाणी घालुन वाढवत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेवुन भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उदगीर चिटणीस पदी निवड त्यांची निवड झाली आहे. यानिवडीबद्दल संदीप कोयले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.