उदगीरमध्ये सफाई कर्मचा-यांचा गौरव...
उदगीर : "सेवा परमो धर्म" या उक्तीला सार्थ ठरवत कोरोनाच्या कठीण काळात , घराच्या बाहेर पडून, आपला जीव धोक्यात आहे याची पूर्ण जाणीव असून , आपण घरी सुरक्षित असताना आपला परिसर स्वच्छ ठेवणारे हे "कोरोना वाॅरियर्स" कोठेतरी यांच्या कार्याचा व त्यांच्यट कष्टाचा सन्मान होणं अपेक्षित होत किंबहुना तशी गरजच होती. असं म्हणतात की प्रोत्साहनाने माणसाच्या कार्यक्षमतेत भर पडते. याची जाणीव ठेवून आणि एक सामाजिक जबाबदारी समजून "उदागिर बाबा मित्र मंडळ" या युवा व्यापारी मित्रांनी एकत्र येऊन, उदगीरमध्ये डॅम रोड येथील गल्ली मध्ये सत्काराचा हा एक छोटासा उपक्रम राबविला.
याअंतर्गत दररोज नित्यनियमाने घरोघरी येणारे नगर परिषदेचे स्वच्छता सेवक (आता त्यांना आपण "कोरोना वाॅरियर्स" असं म्हटलं तर चुकीच होणार नाही. नित्यनियमाने साफसफाई साठी येणाऱ्या कामगारांचा पुष्पहार तथा फुलांच्या वर्षावाने स्वागत केलं आणि प्रत्येकाचा शाल, श्रीफळ तथा सदिच्छा भेट म्हणून छोटीशी राशी अदा करण्यात आली सदर सत्कार हा मान्यवरांच्या हस्ते ते आदराने सुपुर्द करण्यात आली.
या कार्यात उदगीर शहराचे उपनगराध्यक्ष सुधीर भोसले यांनी प्रेरणा व साथ दिली. कार्यक्रच्या यश्वस्वीतेसाठी हर्ष भूतडा, विष्णू मुंडे, द्वारकासजी भूतडा ,सुनील खंदाडे, चैतन्य गुरव, किशोर शिवपुरे, चंद्रकांत रोडगे ,अनंत खेडकर, सोनू भोसले, ओम खंदाडे, प्रसाद रुद्रवार, बस्वराज होणराव व वार्डातील महिलांचा भारतीताई भोसले, ललिता भुतडा , कांता कालाणी, अनिता बलदवा, शोभा इनानी आदींनी परिश्रम घेतले.