गरीब कुटुंबियांना माजी आमदार भालेराव परिवारा तर्फे मदत
उदगीर : कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लॉक डाऊन असल्यामुळे अडचणीत आलेल्या उदगीर व जळकोट तालुक्यातील गोरगरीब निराधार कुटुंबांची प्रत्येक गावातील सरपंचा मार्फत यादी तयार करून अशा गरजवंत व निराधारांना मदत करण्यासाठी उदगीरचे भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांच्या परिवाराने पुढाकार घेवुन मदतीचा हात दिला आहे.
या मदत कार्याची सुरुवात उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांना रितसर माहीती देऊन करण्यात आली. काल भालेराव कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते जळकोट तालुक्यातील गावोगावी त्यांच्या घरी जाऊन बाराशे गरजुंना व निराधार कुटुंबांना ही मदत पोहोचविण्यात आली. यावेळी स्वतः माजी आमदार सुधाकर भालेराव , अमोल सुधाकर भालेराव , मुलगी ऐश्वर्या सुधाकर भालेराव हे उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाच्या घरी जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या ...हे मदत कार्य असेच अविरत पुढे चालणार असून.. सरपंचांनी अशा गरजवंताची यादी.. आमच्यापर्यंत पोहोचवावी असे आव्हान माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी याप्रसंगी केले आहे.