उदगीरच्या आणखी ६ रुग्णांना डिस्चार्ज
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती होते
उदगीर : आज उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातून 13 कोरोना बाधित रुग्णांपैकी 6 रुग्णांना डिस्चार्ज घेऊन घरी सोडण्यात आले. यामध्ये तीन महिला एक लहान मुलगी व दोन पुरुष यांचा समावेश आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, डॉक्टर हरदास, नोडल अधिकारी शशिकांत देशपांडे, मुुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, आदी उपस्थित होते.
कोरुना रुग्णावर यशस्वीपणे मात केलेल्या उदगीर येथील सहा रुग्णांना डिस्चार्ज देताना यावेळी रुग्णालय प्रशासन व उपविभागीय प्रशासनाने टाळ्यांच्या गजरात बरे झालेल्या सर्व सहा रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना उत्साहाने घरी सोडण्यात आले.