शहीद गणपत लांडगे अनंतात विलीन
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लातूर : औसा तालुक्यातील लोदगा गावचे सुपुत्र गणपत सुरेश लांडगे हे सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. काल सकाळी संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले...अहमदनगर येथील आरमर्ड कोर सेंटर च्या पथकाने या शहीद जवानाला अंतिम मानवंदना 'गार्ड ऑफ ऑनर' व सलामी दिली ...तसेच पोलीस पथकाने ही मानवंदना दिली ...
अंत्यसंस्कार साठी परिसरातील असंख्य लोक आले होते ...गणपत लांडगे हे 2013 साली भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते सिक्स महार बोर्डर्स बटालियनमध्ये कार्यरत होते. सियाचीन येथे असताना ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे त्यांना श्वसनचा त्रास झाला होता ...त्यात त्यांना वीरमरण आले आहे. शहीद गणपत लांडगे यांचे पार्थिव काल सकाळी पाच वाजता पुणे येथुन आले. पुण्यावरून मोटारीने त्यांचे पार्थिव लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लोदगा या मूळ गावी आणण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
यावेळी खासदार ओमराजे निबालकर, आमदार अभिमन्यू पवार ,माजी आमदार पाशा पटेल , लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी यावेळी हजर होते.