नवनाथ गायकवाड मित्र मंडळाचे कार्य प्रशंसनीय - मुख्याधिकारी भारत राठोड
उदगीर : कोवीड- 19 या महामारी मुळे जगभर आलेल्या संकटाचा परिणाम उदगीर शहरातील अनेक गोरगरीब जनतेवर झाला असून त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था स्वतःहून पुढे येऊन मदत करत आहेत या महामारीमुळे वाढलेल्या बेरोजगारीमुळे सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या संसाराचा गाडा चालवणे अवघड होऊन बसले आहे. अशाच विधवा महिलांच्या मदतीला " जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले" या संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीप्रमाणे नवनाथ गायकवाड मित्रमंडळाने राशन व गृह उपयोगी वस्तू देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. यापूर्वीही अनेक गरजू व गोरगरीब लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहे. अशा संकटाच्या वेळी नवनाथ गायकवाड मित्र मंडळ यासारख्या अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन गरजू लोकांची मदत करण्याची आवश्यकता आहे असे मत उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड, शहाजी पाटील, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय बिरादार, अॅड. बाळासाहेब नवटक्के, प्रा. सिद्राम शेटकार, युवा उद्योजक यशवंत सोनूफुले, मधुकर वाघमारे, दिल्ली पोलीस अन्सार खान पठाण, दत्तात्रय काळोजी गुरुजी व शशिकुमार बीचकुंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तिरुपती सोसायटी, विकास नगर, रविदास नगर व हनुमान नगर येथील विधवा महिलांना अन्नधान्यांचे किट वाटप करण्यात आले.
या कार्यासाठी राजेश सुत्रवे, संतोष पांढरे, बाळू कदम, गोपीनाथ गायकवाड, रमेश कांबळे, देविदास उदबाळे, प्रशांत वाघमारे व सतीश बिरादार इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.