उदगीर शहरातील दबीरपुरा भागात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने उदगीर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेवक अनिल मुदाळे ही किरकोळ जखमी झाले असुन याबाबत उदगीर शहर पोलीस गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली आहे.