राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या वतीने गरजुंना अन्नधान्याचे किट वाटप

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या वतीने गरजुंना अन्नधान्याचे किट वाटप



   उदगीर : संपुर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. यामुळे शासनाच्या वतीने गेल्या ४० दिवसापासून महाराष्ट्रात लाॅकडाऊन आहे. यामुळे गोरगरीब व कष्टकरी नागरिकांचे हाल होत असुन गोरगरीबांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. गोरगरीब कष्टकऱ्यांचा नेता म्हणून राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांची या मतदार संघात ओळख असुन गरिबांना मदत म्हणून उदगीर मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांच्या वतीने शहरातील गरजु व गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप नुकतेच करण्यात आले.


यावेळी गरजुंना किट देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, अँड.पद्माकर उगिले, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे, महेश स्वामी, सतिश पाटील मानकीकर उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image