श्रीकांत पाटील व सिध्देश्वर पटणे यांच्या वतीने साॅनिटायझर व मास्कचे वाटप
उदगीर : सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने हतबल झाले आहे. कोरोनामुळे आपल्या देशात लॉकडाऊन चालू आहे सर्व जनता घरी बसून प्रशासनाला सहकार्य करत आहे. हे करत असताना प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, नर्स, स्वछता कर्मचारी इत्यादी जनतेच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालून सदैव आपले कर्तव्य चोखपने बजावत आहेत. त्याबद्दल सामाजिक बांधिलकेची जाण ठेवून विकास नगर येथील श्री क्षेत्र महादेव मंदिरचे अध्यक्ष श्रीकांत पाटील व इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांच्या वतीने उदगीर शहर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांसाठी साॅनीटायझर व मास्क पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पी.एस.आय गजानन पाटील, पी.एस.आय. खेडकर, पी.एस.आय. एडके, राजकुमार घोरपडे आदी उपस्थित होते.