उदगीर येथील ११ रुग्णांची कोविडवर मात रुगणालयातुन सुटटी मिळणार, होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणार - ना. अमित विलासराव देशमुख

 


उदगीर येथील ११ रुग्णांची कोविडवर मात
रुगणालयातुन सुटटी मिळणार, होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणार - ना. अमित विलासराव देशमुख



   लातूर  : उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७ कोविड रुग्णांपैकी ११ जणांची प्रकृती उत्तम असुन त्यांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येत असल्याची माहिती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
    या संदर्भाने माहिती देताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले की, उदगीर शहर वगळता संपूर्ण लातूर जिल्हा सदया कोविड १९ मुक्त आहे. अगदी सुरूवातीच्या काळात परराज्यातील १२ प्रवाशी आंध्र प्रदेशात जात असतांना निलंगा येथे आढळून आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यापैकी ८ कोविड पॉझिटीव्ह असल्याचे निर्दशनास आले त्यांच्यावर लातुर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेत उपचार करण्यात आले त्यांनंतर त्यांना निलंगा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. लवकरच त्यांना त्यांच्या आंध्रप्रदेशातील मुळगावी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान संपूर्ण लातुर जिल्हा कोविड मुक्त झाला असतांना उदगीर येथे एका महिलेस कोविड १९ ची लागण झाल्याचे निर्दशनास आले. त्यात त्यांचा मृत्युही झाला. त्यानंतर संबंधित कुटुंब परीरसरातील नागरीकांची तपासणी केली असता आज पर्यत एकूण २७ रुग्ण आढळून आले आहेत. उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. यापैकी ११ जणांची प्रकृती ठणठणीत बरी झाली आहे. त्यांच्यात कोविड १९ ची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे केंदशासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे या ११ रुग्णांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येणार आहे. यापुढील काही दिवस त्यांना त्यांच्या घरी होम क्वॉरनटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे , उर्वरित १६ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांनाही लवकरच सुट्टी देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image