लॉकडाऊनच्या काळात ही ऑनलाईन लेक्चरची सुविधा
उदगीरात लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयाचे विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे
उदगीर : कोरना महामारीचे वैश्विक संकट अवघ्या जगासमोर उभे टाकले असून अवघ्या काही दिवसात जग स्तब्ध झाले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पडल्याने शाळां शाळातून किलबिलणारी भावी पिढी चार भिंतीआड कैद झाली. सुट्टी म्हणावी तर घराबाहेरची मैदानेही बंद झालेली. अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील प्रयोगशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका अनिता यलमटे यांच्या सह इतरही शिक्षकांनी लॉकडाऊन चा सदुपयोग करत ऑनलाईन लेक्चरचा मार्ग निवडला आहे. विशेष म्हणजे यलमटे यांच्या इयत्ता आठवीच्या वर्गासाठी सव्वाशे मुली जोडल्या गेल्या आहेत.
शहरातील लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क करत स्टडी फॉर्म होम या उपक्रमात विद्यार्थ्यांना गुगल, व्हाईस रेकार्डिग, व्हिडिओ काँन्फरन्स, दिक्षा अँप, झुम अँप, युट्युब इ.च्या माध्यमातून दररोज अध्यापन तर केले जातेच शिवाय तंत्रस्नेही बनून नवनवे प्रयोग करण्यासाठीही प्रेरणा दिली जात आहे. इयत्ता आठवी, नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांना या नाविण्यपूर्ण उपक्रमाने लॉकडाऊन मध्ये दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाचे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या ऑनलाईन शिकवणी उपक्रमात अनिता यलमटे यांच्यास अंबूताई दीक्षित, प्रिती शेंडे,रागिणी बर्दापूरकर,राजकुमार म्हेत्रे ,संतोष गजलवार, माधव जोशी, अर्चना ठोंबरे, बलभीम नळगीरकर सहभागी झाले आहेत. यासाठी मुख्याध्यापक संजय विभूते, उपमुख्याध्यापक प्रदिप कुलकर्णी,विभागप्रमुख अंबूताई दीक्षित, लालासाहेब गुळभिले यांचे ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे.