राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून शहीद जवान गणपत लांडगे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून शहीद जवान गणपत लांडगे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन



   लातूर : भारतीय सैन्य दलाच्या 6- महार रेजिमेंट मधील जवान गणपत सुरेश लांडगे यांचे सियाचीन मध्ये कर्तव्यावर असताना श्वसनाचा त्रास होऊन ते शहीद झाले.
  शहीद जवान गणपत लांडगे यांचे पार्थिव दि. 9 मे 2020 रोजी रात्री उशिरा लोदगा येथे दाखल झाले व दि. 10 मे 2020 रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
   राज्याचे सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लोदगा येथे शहीद जवान गणपत लांडगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व शासनाकडून सर्व प्रकारची मदत देण्यात येईल अशी ग्वाही दिली. जिल्हा प्रशासनाने याबाबत तात्काळ कार्यवाही करून लांडगे कुटुंबीयांना मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे औश्याचा तहसीलदार शोभा पुजारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image