आता कोणाचीही गय केली जाणार नाही : राज्यमंत्री संजय बनसोडे

आता कोणाचीही गय केली जाणार नाही : राज्यमंत्री संजय बनसोडे



   उदगीर : शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कोरोना संकटाला सक्तीने आवरावे लागणार आहे, त्यामुळेच प्रशानाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही; असा इशारा उदगीरचे आमदार तथा राज्यमंत्री  संजय बनसोडे यांनी बोलताना दिला आहे.  उदगीर शहरातील नागरिकांना प्रशासन सतत घरी बसण्याची विनंती करीत आहे, पण नागरिक ऐकत नाहीत. पोलीस व कोरोना वारीयर्सच्या विनंतीला मान देत नाहीत. त्यांच्या कामात अडथळे आणत आहेत, तेव्हा नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे, संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे. हे संकट आता सक्तीने आवरावे लागणार आहे. आपण याला वेळीच रोखले नाही, तर कोरोनाचा विळखा सर्वत्र पडणार आहे. तेव्हा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी घरी बसावे, काही कोरोना लक्षणे आढळली तर ताबडतोब प्रशासनाला कळवावे. आपल्या आजूबाजूला कोणाला काही त्रास होत असेल तर कळवा, आपण सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती ना.संजय बनसोडे यांनी केली आहे.



 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image