युवक काँग्रेसच्या वतीने अन्नधान्य किट, सॅनिटायझर, मास्कचे वाटप
उदगीर : लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय राजेश्वरराव निटूरे यांच्या वतीने उदगीर शहरात घरोघरी वृत्तमानपञ वाटप करणाऱ्या ६० जणांना जिवनावश्यक अन्नधान्य किट व मास्क, सँनिटायझर, हॕन्डगोलज्चे वाटप उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक विजय निटुरे, उदगीर तालुका पञकार संघाचे तालुकाध्यक्ष राम मोतीपवळे, महाराष्ट्र राज्य पञकार संघ, संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट ई.एडके, पोलीस कॉन्स्टेबल एस.पी.दळवे यांच्या हस्ते लॉकडाऊनचे नियम पाळत, सोशल डिस्टंसींगचे सामाजिक आंतरांचे पालन करीत वाटप करण्यात आले.
यावेळी पञकार माधव रोडगे, संग्राम पवार, वितरक बंधू संजय अंबरखाने, एजाज मनियार, मल्लेश रक्षाळे, विजय मेंगा, सादीक राठोडे, चंदूलाल जैन, अरविंद वाघमारे, बळीराम साळुंके आदि न्युज पेपर वितरक, एजंट व घरोघरी वाटप करणारी मुले उपस्थित होते.