महावितरण कंपनीने शेती, औद्योगिक क्षेत्राला
अंखडित वीज पुरवठा करावा - राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर : महावितरण कंपनीने उदगीर जळकोट तालुक्यातील औद्योगिक वसाहती, शेतीसाठी लागणारी वीज पुरवठा अखंडित स्वरूपात करावा. या क्षेत्राला वारंवार वीजपुरवठा खंडित होणे योग्य नाही यामुळे या क्षेत्राचे मोठे अर्थिक नुकसान होते. या बाबत योग्य काळजी घ्यावी अशा सूचना राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
उदगीर येथे महावितरणची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार उदगीर व्यंकटेश मुंडे, तहसीलदार जळकोट संदीप कुलकर्णी, न. प. मुख्याधिकारी उदगीर भरत राठोड, गटविकास अधिकारी उदगीर अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी जळकोट चंद्रहार ढोकणे, बसवराज पाटील नागराळकर ,राजेश्वरजी निटुरे या सोबत विद्युत वितरण कंपनी लातुर मुख्य अभियंता आर. आर. कांबळे, विद्युत वितरण कंपनी लातुर अधिक्षक अभियंता नंदीश माने, श्री .जाधव, कार्यकारी अभियंता इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, यात प्रामुख्याने वीज वितरण कंपनी यांच्या अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यात समन्वय असावा, शहरातील विविध भागात सर्वे करावे, वीज पुरवठा बाबत काही तक्रारी असतील तर त्या ताबडतोब निकाली काढण्यात यावेत, उदगीर व जळकोट तालुक्यात आवश्यक असणारे वीज ट्रांन्सफारमर , केबल, इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. नागरिकाच्या अडचणी बाबत कनिष्ट अभियंता यांच्या अघ्यक्षतेखाली समिती स्थापन कराव्यात अशा सुचना दिल्या. स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत अधिकारी यांनी समन्वय साधावा. शहरातील नगरपालिका व महावितरण कंपनीच्या अधिकारी यांनी वीज पुरवठा बाबत आढावा घ्यावा. अशा सुचना राज्याचे पाणी पुरवठा राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी केल्या आहेत.