जिल्ह्यातील 55 वर्षाच्या पुढील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी - राज्यमंत्री संजय बनसोडे

जिल्ह्यातील 55 वर्षाच्या पुढील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी - राज्यमंत्री संजय बनसोडे



   उदगीर : कोर्टाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 55 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांची यादी तयार करून त्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी असे आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.


उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते.


यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी सतिष हरिदास आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना राज्यमंत्री बनसोडे यांनी जिल्ह्यात कोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे . विशेषता उदगीर शहरात कोरूना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील 55 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी अशा सूचना दिल्या यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवत असताना महसूल विभाग , पोलीस विभाग व आरोग्य यंत्रणा यांनी परस्परात योग्य तो समन्वय ठेवावा असे निर्देश व राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image