जगदगुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे 52 लाख रूपयाचा निधी पंतप्रधान सहायता निधीस सुपूर्द
उदगीर : देशात सध्या कोरोना या रोगाने थैमान घातले असून याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन केले होते.
या आव्हानास प्रतिसाद देत प्रत्येक देवस्थान असो वा खाजगी संस्थांनी आपापल्या परीने मदत करत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीज यांच्यावतीने कोरोना या संकटाशी दोन हात करण्यासाठी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सहाय्यता निधी द्वारे 52 लाख रुपयाचा धनादेश नुकताच सुपूर्द केला असल्याची माहिती संबंधित टि्वटर द्वारे समोर आली आहे.
तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा असा उपदेश देणारे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे भाविक भक्त या परिसरात मोठ्या प्रमाणे आहे. महाराजांनी सर्व भक्ताच्या वतीने सहाय्यता निधीसाठी संस्थांतर्फे 52 लाख रुपयाचा भरीव निधी केंद्र शासनाला दिल्याने एक प्रकारे त्यांच्या भक्तांमध्ये एकमेकाला मदत करण्याचे दिसून येत आहे.
संबंधित निधीची माहिती टि्वटर द्वारे समोर आली असुन करोना या संकटाशी सामना करण्यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांनी पुढाकार घेतला आहे.