लातूर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप 5 मे पासून पुढील आदेशापर्यंत बंद - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप 5 मे पासून पुढील आदेशापर्यंत बंद - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत



   लातूर : राज्य शासनाने लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ऑरेंज झोनमधील जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व  इतर आस्थापनांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली होती. त्यानुसार ऑरेंज झोन मध्ये असलेल्या लातूर जिल्ह्यातील वाईन शॉप सुरू करण्याची दिनांक 04 मे 2020 पासून  जिल्हा प्रशासनाने मुभा दिली होती. मात्र दि. 04 मे 2020 रोजी लातूर मधील वाईन शॉप वर सोशल डिस्टन्सचे ( सामाजिक आंतर) पालन होत नसल्याचे दिसून आले. त्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने दि. 5 मे 2020 पासून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.


     लातूर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय लातूर जिल्हा प्रशासनाने घेतला असून दि. 04 मे 2020 रोजी रात्री त्याबाबतचे आदेश  काढण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास वाईन शॉप परवानाधारक आणि तेथे विनाकारण गर्दी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश ही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले आहेत.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image