35 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावे - आढावा बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी

 35 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावे


आढावा बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी



लातूर : आज दि. २७ मे २०२० दुपारी १२.१५ वा कोवीड 19 आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरेन्स द्वारे पार पडली. यामध्ये जिल्ह्यांमध्ये करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना बद्दल आढावा घेण्यात आला . लातूर जिल्हा परिषदेकडे सध्या असलेल्या ऍम्ब्युलन्स या 2005 या वर्षी खरेदी केलेल्या असून त्यां गाड्यांची मुदत संपलेली आहे. त्या गाड्या जवळजवळ निकामी होत आलेल्या आहेत. आरोग्य केंद्रांसाठी नवीन ॲम्बुलन्सची आवश्यकता असल्यामुळे या बैठकीमध्ये covid-19 आजाराच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपत्ती व्यवस्थापनासाठी 35 प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. 


 covid-19 आजाराच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन 2020-21 अंतर्गत जिल्ह्यामधील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ॲम्बुलन्स ही उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे . 


 ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे , लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आदी उपस्थित होते.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image