विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्याच्या रकमे बाबत 25 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा

 


विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्याच्या रकमे बाबत प्राचार्य/ विद्यार्थ्यांनी 25 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा


   लातूर :  जिल्हयातील शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विना अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य/ विद्यार्थ्यांना सन 2015-16, 2016-17 व 2017-18 मध्ये प्रवेशित अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना लाभ देण्यासाठी महाईस्कॉल प्रणाली कार्यान्वित होती. त्यानुषंगाने भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती (फ्रीशिप) व व्यावसायिक पाठयक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रक्कमा मंजूर करुन महाविद्यालय व विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या होत्या.
तथापी सन 2015-16 ते 2017-18 मधील अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्जामध्ये चुकीचे बँक खाते क्रमांक, चुकीचे आय.एफ.एस.सी. कोड भरलेले असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची निर्वाहभत्याची रक्कम अद्याप या कार्यालयाच्या बँक खात्यावर अखर्चित (शिल्लक) आहे.
अखर्चीत रक्कमा शासनखाती जमा करण्याबाबत शासनस्तरावरुन सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सन 2015-16 ते 2017-18 या कालावधीतील अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रक्कमा मंजुर झालेल्या आहेत मात्र सदर रक्कम तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या खात्यावर जमा झालेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी दि. 25 मे 2020 पर्यंत या कार्यालयास संपर्क करुन अचूक वैयक्तिक बँक खात्याच्या बँक पासबुकची छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी. विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या शिष्यवृत्तीच्या मंजुर रक्कमा शासन खाती जमा केल्यानंतर त्या मागणी केल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे प्रभारी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण लातूरचे  शा.व. देव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image