माजी मुख्यमंत्री विलासरावजी यांच्या जयंतीनिमित्त 2275 किटचे वाटप
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या वतीने हजारो जिवनाश्यक किटचे वाटप...
उदगीर : माजी मुख्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे सुपुत्र विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गरीबांना 2275 किटचे वाटप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या वतीने करण्यात येत आहे. आज पर्यंत लाॅकडाऊनच्या काळातही जवळपास १० हजारच्या जवळपास श्री.निटुरे यांनी गोरगरीबांना मदत केली असल्याने गरिबांचे ते ख-या अर्थाने आधारवड झाले आहेत.
दि.२७ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थित या जीवनाश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, कल्याण पाटील, सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे, सरपंच ज्ञानेश्वर बिरादार, आदी उपस्थित होते.
आजपर्यंत उदगीर शहर व तालुक्यात गोरगरीबांच्या मदतीला नेहमीच धावणारे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी वेगवेगळ्या माध्यामातून समाजसेवा करुन असंख्य कुटुंबाना आधार दिला आहे तर त्यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे हे आपल्या वडिलांचाच वारसा सांभाळत असुन शहरातील अशोक नगर, किल्ला गल्ली, समतानगर, बनशेळकी रोड, गांधीनगर, संजय नगर, फुलेनगर व शहरालगतच्या अनेक भागातील गोरगरिबांना आजपर्यंत जीवनावश्यक किटचे वाटप केले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील गरीब नागरिकांनी निटुरे कुटुंबीयाचे आभार मानले आहेत.