आज उदगीर येथील प्रलंबित 12 अहवाल पैकी 7 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
एकुण रुग्णांची संख्या 21 वर
लातूर :आज उदगीर येथील 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव आला आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.