निडेबन येथे कोरोना विषाणु संदर्भात जनजागरण व फवारणी
उदगीर : देशात कोरोना महामारीने थैमान घातले असुुुन यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व उदगीर विधानसभाचे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी युवक काँग्रेस लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नारळकर यांच्या सूचनेनुसार वाढदिवसानीमित्त आनोखा उपक्रम उदगीर तालुक्यातील निडेबन येथे कोरोना रोगा विषयी जनजागरण व स्वच्छता करुन फवारणी कै.चांदोबा सोमवंशी मानव विकास बहुउद्देशीय संस्था निडेबन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस लातूर जिल्ह्याच्या वतीने फवारणी करणारनण्यात आली.
यावेळी कै.चांदोबा सोमवंशी मानव विकास बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सोमवंशी, समाजसेवक चंद्रकांत पाचंळ, धम्मसागर सोमवंशी, राजरत्न सोमवंशी, प्रितम सोमवंशी, प्रमोद गायकवाड, विशाल सोमवंशी, सचिन सोमवंशी, शशिकांत कांबळे, अविनाश सोमवंशी, गोविंद सोमवंशी, शरद सोमवंशी, रतिकांत आनंत वाळ, प्रदीप कांबळे, सतिश गायकवाड, सचिन गायकवाड, विशाल सूर्यवंशी, गोटू शिंदे आदी उपस्थित होते.