उदगीरच्या रुग्णाचे दिल्ली कनेक्शन नाही; कोरोना लक्षणेही नाहीत

उदगीरच्या रुग्णाचे दिल्ली कनेक्शन नाही; कोरोना लक्षणेही नाहीत


 लातूर जिह्यात एकही दिल्ली कनेक्शन रुग्ण नाही, उदगिरच्या तरुणाचा दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग नव्हता


उदगीर : उदगीर मधील रुग्णास खबरदारी म्हणून बुधवारी दाखल करून आरोग्य तपासणी केली. त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. त्या रुग्णाचे दिल्ली कनेक्शन अजिबात नाही. आपल्या जिल्ह्यात दिल्ली संदर्भाने कोणीही नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले.


डॉ. ढगे म्हणाले, सदर व्यक्ती १५ दिवसापूर्वी दिल्ली येथून प्रवास करून आला, मात्र त्याचा तेथील कार्यक्रमात सहभाग नव्हता. त्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दुजोरा दिला. आपल्या जिल्ह्यात एकही दिल्ली कनेक्शन संबंधाने रुग्ण नाही. मात्र आपण प्रत्येक शक्यता पडताळून पाहत आहोत. कोणतीही उणीव राहू नये म्हणून अधिकाधिक तपासणी व प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करत आहोत. मात्र चुकीची माहिती देऊन प्रशासन व यंत्रणेची धावपळ करू नये असे आवाहन करण्यात आले. दरम्यान पुढील काही दिवस घराबाहेर पडू नका, सहकार्य करावे असेही कळविण्यात आले


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image